29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसाता-यातून शरद पवारांचा उमेदवार अखेर ठरला

साता-यातून शरद पवारांचा उमेदवार अखेर ठरला

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार ठरला आहे. साता-यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शशिकांत शिंदे १५ एप्रिल रोजी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीच्या उमेदवाराविरोधात तगडा उमेदवार देण्यावरून महाविकासआघाडीकडून हालचाली सुरू होत्या. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणामुळे ही निवडणूक लढायला नकार दिला, त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी ही निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला गेला. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढायला नकार दिला. निवडणूक लढायची असेल तर आपण काँग्रेसच्या चिन्हावर उभे राहू अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी घेतल्याचं बोलले गेले.

पृथ्वीराज चव्हाण तुतारीच्या चिन्हावर लढायला तयार न झाल्यामुळे शशिकांत शिंदे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतला. शरद पवारांच्या साता-यातील बैठकीनंतर यावर तोडगा निघाला आणि शशिकांत शिंदेंचे नाव निश्चित झाले. आता शशिकांत शिंदे यांचा सामना उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध होणार आहे. साता-यातून महायुतीने उमेदवाराची घोषणा केली नसली तरी या मतदारसंघातून उदयनराजे भोसले निवडणूक लढवतील, हे निश्चित आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR