34.7 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजन'पुष्पा २' चा दमदार टीझर झाला रिलीज

‘पुष्पा २’ चा दमदार टीझर झाला रिलीज

मुंबई : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आज आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त चाहते त्याला खूप शुभेच्छा देत आहेत. वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जुनला आणि त्यांच्या चाहत्यांना निर्मात्यांनी एक मोठे गिफ्ट दिले असून, त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे, जो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाचा टीझर रिलीज होताच ट्विटरवर ट्रेंड करू लागला आहे.

साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा २’ची चाहते अनेक दिवसांपासून आतूरतेने वाट पाहत आहेत. आज त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमधील अल्लू अर्जुनचा लूक पाहण्यासारखा आहे. या टीझरमध्ये अल्लू अर्जुन साडी घालून हातात त्रिशूळ घेवून गुंडांना मारहाण करताना दिसत आहे.यावेळी प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढतील अशी जबरदस्त अ‍ॅक्शन दाखवण्यात आली आहे. मात्र, टीझरमध्ये रश्मिका मंदान्नाला दाखवण्यात आले नाही. दोन दिवसापूर्वीच रशिमकाच्या वाढदिवसापूर्वी तिचा पहिला लूक समोर आला होता. ‘पुष्पा २’ चित्रपटाचा टीझर पाहून लोक बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड मोडेले जातील अशी प्रतिक्रिया देत आहेत.

कधी प्रदर्शित होणार पुष्पा २

अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग पुष्पाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती यावेळी‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल आणि आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड आपल्या नावावर करेल, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR