22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडासचिन तेंडुलकरच्या पंक्तीत शुभमन!

सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत शुभमन!

विशाखापट्टनम : भारतीय क्रिकेटमधील प्रिन्स शुभमन गिलने तिस-या क्रमांकावर तिहेरी आकडा गाठला. त्याने कसोटीत तिस-या क्रमांकावर खेळताना १३ डावांनंतर शतकी खेळी केली. विशेष म्हणजे २०१७ नंतर भारताकडून कसोटीमध्ये तिस-या क्रमांकावर भारतात खेळताना आलेले हे पहिलेच शतक आहे. यापूर्वी चेतेश्वर पुजाराने २०१७ मध्ये भारताकडून भारतात खेळताना शतक ठोकले होते.

शुभमन गिलवर गेल्या काही दिवसांपासून टीका होत होती. जेव्हापासून शुभमन गिल हा कसोटी क्रिकेटमध्ये तिस-या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला होता. अखेर १३ डावांनंतर त्यांच्या बॅटमधून मोठी खेळी आली. त्याने संघ अडचणीत असताना शतकी खेळी करत भारताला दुस-या कसोटीत चांगल्या स्थितीत पोहचवले.

शुभमन गिलचे हे १० वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. कसोटीत त्याने तीन शतके ठोकली आहेत. त्यातील दोन शतके भारतात आली. गिलने वनडे क्रिकेटमध्ये ६ तर टी-२० मध्ये १ शतक ठोकलं आहे.

या शतकासोबतच भारताकडून वयाच्या २४ व्या वर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकणा-यांच्या यादीत गिलने स्थान पटकावले आहे. या यादीत पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर आहे. त्याने वयाच्या २४ व्या वर्षी ३० आंतरराष्ट्रीय शतके ठोकली होती. तर दुस-या स्थानावर विराट कोहली आहे. त्याने २१ शतके ठोकली होती. १० शतकांसह गिल तिस-या स्थानावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR