24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रवादग्रस्त पोस्ट व्हायरल प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये बंद

वादग्रस्त पोस्ट व्हायरल प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये बंद

अमरावती : अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याने अमरावतीमध्ये वातावरण पेटले आहे. सोशल मीडियावर महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ‘बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. चांदूर बाजार, मोर्शी, दर्यापूरमध्ये ११ ते ३ या वेळेत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले असून दर्यापूर शहरात बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानीमातेचे दर्शन घेत असतानाच्या फोटोसोबत छेडछाड करत तो फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवला होता त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून निषेधार्थ बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

आज ‘बंद’चे आवाहन केले असतानाही काही दुकानदारांनी दुकान बंद ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याचे पाहायला मिळाले.
समाजकंटकाने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे वातावरण चांगलेच तापले होते. मोर्चाही काढण्यात आला होता. यामध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR