38 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुस्लिम धर्मातील मागास जातींनाही आरक्षण द्या

मुस्लिम धर्मातील मागास जातींनाही आरक्षण द्या

मुंबई : ‘‘आरक्षण हा मागास समाजाचा अधिकार आहे. बाबासाहेबांनी संविधानात लिहिलेला आहे. जनगणना करत नाहक्त, त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुस्लिम धर्मातही मागास जाती खूप आहेत, मूळ हा धर्माचा होऊ शकत नाही. मुस्लिम धर्मातील ज्या मागास जाती आहेत, त्यांनाही जनगणना करून आरक्षण दिले पाहिजे’’ असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. सोबतच धनगर व ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. या विषयावर बोलताना नाना पटोले यांनी मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे असे वक्तव्य केले आहे. पुढे बोलताना पटोले म्हणाले, ‘मराठा विरुद्ध ओबीसी हे सरकार प्रायोजित होऊन घडवत आहे, राज्यातील एक मंत्री एका समूहाबरोबर जाऊन चॅलेंज करत असेल तर लक्षात आले पाहिजे की, हे सरकार प्रायोजित महाराष्ट्राला पेटवण्याचे काम करत आहे.

पुढे बोलताना पटोले म्हणाले, सुनील प्रभू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो, असे साक्षीमध्ये सांगितले पण बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेखसुद्धा प्रोसिडिंगमध्ये येऊ द्यायचा नाही. या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने कारवाई होत असेल तर ते फारच चुकीचे चालले आहे. दुरुस्ती व्हावी, विधानसभेचे अधिवेशन आहे. त्यातही आम्ही चर्चा करू, अधिकार असतात. मात्र, ज्याप्रमाणे विधिमंडळाच्या कामकाजाला काळिमा लावण्याचे काम होत असेल तर त्यात आम्हाला शांत बसता येणार नाही, आम्ही जाब विचारू’’ असेही ते म्हणाले.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात इडीने संपत्ती जप्त केली आहे. त्यावर ते म्हणाले की, चिडलेल्या भाजपचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांची हार झालेली आहे.

पंतप्रधानांच्या सभेला लोक जमा होत नाहीत. गृहमंत्री यांच्या सभेला जमा होत नाहीत. त्यांच्यासमोर सगळीकडे हार निश्चित ठरलेली आहे, अशावेळी सूड उगवत ही कारवाई त्यांनी केलेली आहे, असे नाना पटोले म्हणाले.

चुराडा आणि लूट करण्याचे काम सुरू
संत तुकाराम महाराजांचा अपमान करणा-यांच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री जात असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी जावे किंवा जाऊ नये, आमच्यासाठी इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या पैशाचा चुराडा आणि लूट करण्याचे काम सुरू आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR