21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांसाठी बहीण निवडणूक मैदानात

अजित पवारांसाठी बहीण निवडणूक मैदानात

बारामती : प्रतिनिधी
बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्याचवेळी त्यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे. त्यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार याला निवडणूक मैदानात उतरवले आहे. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत कुटुंबातील कोणीही नाही. परंतु त्यांच्या सावत्र बहीण रजनी इंदुलकर प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी एक दिवस अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले आहे.

रजनी इंदुलकर म्हणाल्या, अजित पवार नुसते बारामतीचे नेते नाहीत. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांचे राज्यात नाही तर देशभरात नाव आहे. त्यांच्यासाठी माझा जीव तुटला. त्यामुळे मी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडले. अजित पवार कोणतीही गोष्ट किंवा काम सर्वोत्तम करतात. ते खूप मेहनत करतात. सध्याची परिस्थिती पाहून त्यांना वाटत असेल या लोकांसाठी मी दिवसरात्र झटलो. पहाटेपासून रात्रीपर्यंत काम केले. कुटुंबाची पर्वा केला नाही. परंतु आज मला मते मागण्याची वेळ येत आहे. हे दुर्दैव आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होणार
अजित पवार जेव्हा, जेव्हा मला नमस्कार करतात, तेव्हा तेव्हा मी त्यांना आशीर्वाद दिला आहे. त्यांना एक दिवस मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेले मला पाहायचे आहे. त्यांच्यात ती पात्रता आणि गुणही आहेत. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी माझी अपेक्षा आहे, असे रजनी इंदुलकर यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR