31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्रवंचितची सहावी यादी जाहीर

वंचितची सहावी यादी जाहीर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने सातारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत रघुनाथ कदम यांना उमेदवारी जाहीर केली तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी घोषित केली.

तसेच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने यवतमाळ-वाशिम येथील समनक जनता पक्षाचे अनिल जयराम राठोड यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी संभाजीनगरच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची मोठी घोषणा केली आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्या, असे जाहीर आवाहन ओवेसींनी केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा आंबेडकर आणि ओवेसींची युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. नरेंद्र मोदी यांची भूमिका हिटलरसारखी असून त्याचपद्धतीने त्यांची वाटचाल आहे. मोदींना थांबवण्याची हीच वेळ असून लोकसभा निवडणूकीत भाजपाला त्यांची जागा दाखवा असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR