23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाहार्दिक पंड्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर

नवी दिल्ली : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे विश्वचषकातील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. हार्दिकने सोशल प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे की, हे ‘पचवणे’ त्याच्यासाठी कठीण आहे, पण तो मनापासून टीम इंडियासोबत असेल आणि प्रत्येक सामन्यातील प्रत्येक चेंडूवर संघासाठी घोषणा देणार आहे. हार्दिक पांड्याने त्याला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. हार्दिकने लिहिले की, अद्भुत शुभेच्छा, प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. बांगलादेशविरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी हा मोठा धक्का आहे.

आयसीसीच्या म्हणण्यानुसार, स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही, त्यामुळे तो स्पर्धेतील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. गेल्या महिन्यात पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती.

टीम इंडियाच्या शेवटच्या लीग मॅच किंवा सेमीफायनल किंवा फायनलपूर्वी हार्दिक तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती, पण आता हे स्पष्ट झाले आहे की 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियासाठी कोणताही सामना खेळणार नाही. हार्दिक पांड्या सध्याच्या विश्वचषकात चार सामने खेळला असून त्याने २२.६ च्या सरासरीने पाच विकेट घेतल्या. त्याला एका सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली आणि ११ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला.

प्रसिद्ध कृष्णाचा प्लेइंग ग्रुपमध्ये समावेश
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा प्लेइंग ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो निवडीसाठी उपलब्ध असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR