27.5 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeलातूरपंतप्रधान मोदींच्या सभेसाठी वृक्षांची कत्तल

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी वृक्षांची कत्तल

एका तासाच्या सभेसाठी शेकडो वृक्षांचा बळी

 लातूर :  सध्या लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. दिल्लीतील नेते मंडळी गल्लीत पोहचले आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रचारसभा घेत आहे. ३० एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लातूर येथे भाजपची प्रचार सभा घेत आहेत. लातूर येथील रिंगरोड परिसरातील सारोळा रोड येथे मोदींची सभा होणार आहे. परंतु सभेसाठी जाणारा मार्ग व त्या मैदानवरील वृक्षतोड सर्रासपणे होत आहे.
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी सारोळा रोड परिसरात मोठी जय्यत तयारी आठ दिवसापासून सुरू आहे. पंतप्रधान ज्या मार्गावरून येणार त्या मार्गाचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. परिसरातला कचरा व घाण साफ करण्यात येत आहे. परंतु सर्वात मोठी बाब म्हणजे सभेसाठी जाणारा मार्ग व त्या मैदानवरील वृक्षतोड सर्रासपणे होत आहे.
एका बाजूने लातूर वृक्ष, ग्रीन लातूरच्या माध्यमातून सुपर्ण जगताप, डॉ.पवन लड्डा यां सारखी मंडळी आपल्या टीम सोबत कष्टाने एक एक थेंब पाणी टाकून वृक्ष वाढवून पर्यावरण संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुस-या बाजूला एका तासाच्या सभेसाठी शेकडो वृक्षांचा बळी घेऊन लातूरच्या पर्यावरणाचा -हास केला जात आहे अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR