33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयविशेष न्यायाधीश नागपालांची बदली

विशेष न्यायाधीश नागपालांची बदली

नवी दिल्ली : दिल्ली अबकारी धोरण घोटाळ््याशी संबंधित खटल्यांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांची बदली करण्यात आली आहे. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश कावेरी बावेजा करणार आहे. दरम्यान, विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांची तीस हजारी न्यायालयात बदली करण्यात आली. विशेष म्हणजे ईडी आम आदमी पार्टी आणि त्यांच्या नेत्यांना दारू घोटाळ््यात आरोपी बनवत आहे.

आपचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह याच घोटाळ््या प्रकरणी तुरुंगात आहेत. न्यायाधीश नागपाल हे दारू धोरण प्रकरण सुरू झाल्यापासून त्यावर देखरेख करत आहेत. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या तेलंगणाच्या आमदार के कविता यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR