परभणी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सेलू येथील नूतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन ड झोन क्रिकेट स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचा संघ प्रथम आला आहे. सदरील स्पर्धेत एकूण अकरा संघांनी सहभाग घेतला होता. हे संघ हिंगोली व परभणी दोन्ही जिल्ह्यातून सहभागी झाले होते. या स्पर्धेत सर्व संघांवर एकतर्फी वर्चस्व गाजवून खेळाडूंनी हा विजय मिळवला.
संघात कर्णधार ऋतिक जाधव, अभिषेक जाधव, ओमकार कंधारकर, महादेव अंभोरे, शादुल शेख, योगिनंद भोकरे, राम चव्हाण, समर्थ देशमुख, शत्रुघ्न कोपनर, लवेश जाधव, शाहिद सय्यद रेहान शेख, योगेश जाधव, बालाजी जोगदंड, किशन जाधव, अक्षत खंदारे या खेळाडूचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख डॉ. संतोष कोकीळ, प्रा. राजेसाहेब रेंगे, गणेश गरड यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूच्या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळुंके, आ. सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. उत्कर्ष किट्टेकर, प्रबंधक विजय मोरे, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचा-यांनी अभिनंदन केले.