22.6 C
Latur
Thursday, August 21, 2025
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारी कर्मचा-यांना गणपतीपूर्वीच वेतन

राज्य सरकारी कर्मचा-यांना गणपतीपूर्वीच वेतन

मुंबई : प्रतिनिधी
पुढील आठवड्यापासून सुरु होणा-या गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शासकीय कर्मचा-यांना ऑगस्ट २०२५ या महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वित्त विभागाने गुरुवारी शासन निर्णय जारी केला. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन कर्मचा-यांच्या बँक खात्यात २६ ऑगस्टला जमा केले जाणार आहे.

येत्या २७ ऑगस्टला लाडक्या बाप्पांचे आगमन होत आहे. गणेशोत्सवाची धामधूम लक्षात घेता सरकारने कर्मचा-यांना त्यांचे मासिक वेतन सहा दिवस आधीच देण्याचे ठरवले आहे. या निर्णयाचा लाभ सरकारी कर्मचा-यांसह सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यता आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषिक विद्यापीठे, कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR