27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरमराठा क्रांतीचा राष्ट्रीय महामार्गावर आठ तास रास्ता रोको

मराठा क्रांतीचा राष्ट्रीय महामार्गावर आठ तास रास्ता रोको

लातूर : प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात तब्बल ८ तास रास्ता रोको करण्यात आला. रुग्णवाहिका, स्कुल बस व माध्यमांच्या प्रतिनिधींची वाहने वगळता आंदोलन कालावधीत कोणतेच वहान या मार्गावर धावू शकले नाही. लातूर-सोलापूर मार्ग, छत्रपती चौक ते पीव्हीआर चौक व राजीव गांधी चौक ते गरुड चौक या मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा दिसत होत्या.

सकाळी १० वाजेपूर्वीच मराठा क्रांतीचे युवक छत्रपती चौकात जमले व त्यांनी महामार्गावरच मंडप ठोकला. त्यांनतर त्यांनी तिथे आपापली वाहने आडवी लावूली व मार्गावरच टायर पेटवून दिले. त्या परिसरात धुरच धुर झाला. रसत्यावरच अनेकांनी बैठक दिली व मनोगतेही व्यक्त केली. या मार्गावर पहावे तिकडे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे लातूर-सोलापूर मार्गावर असणा-या पेठ, बुधोडा येथेही असाच रास्ता रोको असल्याने पर्यायी मार्ग मिळणे तसेच रांगेतून बाहेर पडणे वाहनधारकांना शक्य नसल्याने त्यांना आंदोलन संपेपर्यंत वाट पहावी लागली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरुच होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR