21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूर६३ हजार हेक्टरवरील ऊसाचे होणार गाळप

६३ हजार हेक्टरवरील ऊसाचे होणार गाळप

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आसला तरीही ऊसाचे पिकही जोमात आहे. साखर कारखान्याचे व कृषि विभाग यांच्या अहवालानुसार लातूर जिल्हयातील शेतक-यांनी गेल्यावर्षी ६३ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड केली आहे. यावर्षी साखर कारखान्यांच्या माध्यमातून ४५ लाख ७४ हजार ९५२ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. जिल्हयातील साखर कारखान्यांच्याकडून ऊस गाळप हंगामास सुरूवात झाली आहे.

लातूर जिल्हयात सरासरी ७९१.६० मिमी पाऊस पडतो. तो यावर्षी ५४० मिमी म्हणजेच तो वार्षीक सरासरीच्या ६९.१८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हच्या भूजल पातळीतही म्हणावी तशी वाढ झाली नाही. असे असले तरी शेतक-यांनी सुक्ष्म सिंचनाचा वापर करून ऊसाचे पिक जोमदारपणे जोपासले आहे. कृषि विभागाच्या अहवालानुसार गेल्यावर्षी शेतक-यांनी ६४५.४० हेक्टर क्षेत्रावर आडसाली (जून-जुलै) ऊसाची लागवड केली. पूर्व हंगामी (ऑक्टोबर-नोव्हेबर) ११ हजार ८०६.८० हेक्टरवर लागवड, डिसेंबर ते जानेवारी दरम्यान १० हजार ६६०.०५ हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली. तर तोडणी झालेला ३१ हजार १४३.२९ हेक्टर क्षेत्रावरील खोडवा ऊसाची शेतक-यांनी जोपासना केली आहे. तसेच साखर कारखान्यांच्याकडील नोंदी असा ६३ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावरील ऊस यावर्षी गाळपासाठी उपलब्ध असणार आहे. यावर्षीचा ऊस तोडणी हंगाम सुरू झाला आहे.

गेल्यावर्षी जिल्हयातील ६ सहकारी व ६ खाजगी साखर कारखान्यांनी अशा १२ साखर कारखान्यांनी ४३ लाख ३९ हजार ८०५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करत ४३ लाख ८२ हजार ५६ क्विंटल साखरेचे उत्पादन करत साखर उतारा १०.०१ असा मिळाला होता.यात सर्वाधिक उसाचे गाळप ट्वैटीवन शुगरने ७ लाख ६२ हजार २३८ मेट्रीक टन करून ८ लाख १५ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर साखर उतारा १०.७ असा राहिला. जागृती शुगरने ६ लाख ३२ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ६ लाख ३४ हजार २१० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर साखर उतारा १०.०३ राहिला. विलास सहकारी साखार कारखान्याने ५ लाख ७३ हजार ३१८ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ६ लाख १४ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर साखर उतारा १०.७१ राहिला. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने ५ लाख ५१ हजार ६११ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ४ लाख ८१ हजार ६२० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर साखर उतारा ८.७३ असा राहिला. सिध्दी शुगर लि. या साखर कारखान्याने ५ लाख ३१ हजार ५६३ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ५ लाख १६ हजार ४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर साखर उतारा ९.७१ असा राहिला. रेणा सहकारी साखर कारखान्याने ४ लाख ४७ हजार २०५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ४ लाख ४३ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर साखर उतारा ९.९१ टक्के असा राहिला.

विलास २ तोंडार या साखर कारखान्याने ४ लाख १६ हजार ३७३ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ४ लाख ८२ हजार ६० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याने साखर उतारा ११.५८ असा राहिला. संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याने १ लाख ३० हजार १०३ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १ लाख ४१ हजार ८७० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याने साखर उतारा १०.९ असा राहिला. पन्नगेश्वर शुगरने १ लाख २३ हजार ६९२ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १ लाख ६ हजार क्विंटल साखेरचे उत्पादन केले. तर साखर उतारा ८.५७ असा राहिला. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्याने १ लाख ४ हजार ९२५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ९१ हजार २८५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर साखर उतारा ८.७ राहिला.श्री साईबाबा शुगर लि. या साखर कारखान्याने ६५ हजार २३७ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ५५ हजार ३९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर साखर उतारा ८.४९ राहिला.शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी या साखर कारखान्याने १ हजार ५४० मेट्रीक टनऊसाचे गाळप करून ८३१ क्ंिवटल साखरेचे उत्पान केले. तर साखर उतारा ५.३९ असा राहिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR