26.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसांगलीत विशाल पाटलांना वंचितचा पाठिंबा

सांगलीत विशाल पाटलांना वंचितचा पाठिंबा

सांगली : लोकसभा जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढला आहे. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी ही जागा काँग्रेसलाच मिळावी अशी मागणी केली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला गेली असून ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. दरम्यान, आता विशाल पाटील ही लोकसभा अपक्ष लढवणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडीनेही विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातून जर विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली तर वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आज प्रकाश आंबेडकर यांची नागपूर येथील उमरखेडमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी सांगली लोकसभेवर भाष्य केले. या सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील माझ्याकडे आले होते, काय करायचे विचारत होते. मी त्यांना म्हणालो की, हिंमत असेल, तर लढा. तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठींबा देतो. आता त्यांच्यात हिंमत आहे की, नाही पाहायचे आहे. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडून आणू, अशी ग्वाही देतो असेही आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, आता वंचितच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केली तर महाविकास आघाडीसमोर हे मोठे आव्हान असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR