24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआमदार आमच्या सोबत आल्याने सुप्रिया सुळेंना नैराश्य : तटकरे

आमदार आमच्या सोबत आल्याने सुप्रिया सुळेंना नैराश्य : तटकरे

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. खासदार सुनील तटकरे यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परिशिष्ट दहा नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली आहे. या याबाबत सुनील तटकरे यांनी प्रतीक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मोठ्या संख्येने आमदार आमच्या सोबत आल्याने सुप्रिया सुळेंना नैराश्य आले आहे. आम्ही सुद्धा पिटीशन दाखल केली असून आमची सुद्धा तीच मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तटकरे म्हणाले की, आम्ही सुद्धा पिटीशन दाखल केली आहे. संसदरत्न, श्रीनिवास पाटील आणि फौजिया खान यांच्याबाबत पिटीशन दाखल केली आहे. आमचे देखील तेच म्हणणे आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने पिटीशन दाखल केली. संसदरत्न नेहमीच अदृश्यशक्ती असा उल्लेख केला आहे. मोठ्या संख्येने आमदार आमच्यासोबत आल्याने त्यांना नैराश्य आले असेल. शपथविधीच्या दिवशी अमोल कोल्हे आमच्या सोबत होते. त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला समर्थन दिले, असे सुनिल तटकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR