महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा; दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी 

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पावसाअभावी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून शेतक-यांसाठी मदत जारी करण्यात आली. दरम्यान राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत महत्त्वाची बैठक घेतली. मात्र, या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते की नाही, यावरूनही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत ही बैठक पार पडली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतीचे नुकसान आणि संभाव्य मदतीच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, तसेच केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख आणि केंद्रीय संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्यासह पथकातील सदस्य उपस्थित होते. मात्र, राज्य सरकारमधील महत्त्वाचे घटक असलेल्या दोन्ही उपमुख्यमंर्त्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. त्यामुळे महायुती सरकारमध्ये नेमके काय सुरू आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही नेते नाराज असल्याचीही चर्चा होत आहे. तसेच, दोन्ही उपमुख्यमंर्त्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते की नाही, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शेतक-यांच्या मागण्या कधी मान्य होणार?
दुष्काळासारख्या महत्त्वाच्या विषयावर झालेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान शेतक-यांनी फक्त आश्वासन नको तर दिलेला शब्द पाळा आणि लवकरात लवकर दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी उपाययोजना लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच कोकणातील काही जिल्ह्यातील शेतक-यांनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे. आता शेतक-यांच्या या मागण्या कधी मान्य होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये जबरदस्ती कर्जवसुलीविरोधात भीम आर्मी आक्रमक
03:39
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात उदगीरमध्ये २५ तारखेला एल्गार आंदोलन
03:05
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये घरेलू महिला कामगारांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी गांधी चौकात धरणे आंदोलन
06:46
Video thumbnail
Latur News|दुष्काळात हसेगावच्या सेवालायाचा पुढाकार! १०० गायींच्या संगोपनासाठी गो-सेवालय
07:47
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44
Video thumbnail
Latur|लातूरच्या आंबेडकर पार्कवर खासगी वाहनांचे अतिक्रमण? भीमसैनिक आक्रमक; आंदोलनाचा इशारा
01:50
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध
02:46
Video thumbnail
Latur District Bank Election 2026|धीरज देशमुख यांची लातूर जिल्हा बँकेत बिनविरोध निवड
01:31
Video thumbnail
Latur Crime News|शेकडो नागरिकांसमोर युवकावर कोयत्याने वार; औसा शहरात खळबळ
00:54
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दसरा उत्सव | हल्ला मोहल्ला आणि भव्य नगरकीर्तन
04:43
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते ‘मिरा सारीज’चे थाटात उद्घाटन
03:33

Latest news