कोलकाता : आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी श्रीलंका क्रिकेट टीम झिंबाब्वे दौ-यावर जाणार आहे. श्रीलंका या दौ-यात वनडे आणि टी २० सीरिज खेळणार आहे. उभयसंघात २ वनडे आणि ३ टी २० सामने खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेने झिंबाब्वे विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिका २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
चरिथ असलंका १६ सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार आहे. निवड समितीने आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळणा-या ईशान मलिंगा याला संधी दिली नाही. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शिराज याचाही समावेश केलेला नाही. शिराजने ९ महिन्यांआधी श्रीलंकेसाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. शिराज तेव्हापासून कमबॅकच्या प्रतिक्षेत आहे. शिराजने एकदिवसीय कारकीर्दीत एकूण २ सामने खेळले आहेत. शिराजने २ ऑगस्ट २०२४ रोजी टीम इंडिया विरुद्ध पदार्पण केले होते.
तसेच वानिंदु हसरंगा याला दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. हसरंगाला जुलै महिन्यात टी २०्र मालिकेत दुखापत झाली होती. हसरंगाला तेव्हा दुखापतीमुळे ३ सामन्यांच्या या मालिकेतून बाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर आताही हसरंगाला दुखापत आडवी आली. नुवानिदू फर्नांडो याचे कमबॅक झाले आहे.
टी २० नंतर वनडे सीरिजचा थरार
श्रीलंका २२ ऑगस्टला झिंबाब्वे दौ-यासाठी रवाना होणार आहे. उभयसंघात एकदिवसीय मालिकेनंतर ३ ते ७ सप्टेंबर दरम्यान ३ सामन्यांच्या टी २० मालिकेचा थरार रंगणार आहे. या टी २० मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केलेला नाही. मात्र वनडे संघातीलच बहुतांश खेळाडूंना टी २० मालिकेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.