35.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeराष्ट्रीयअयोध्येत लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर

अयोध्येत लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार असून आजपासून पूजा विधी सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स झळकले आहेत. राम घाट परिसरात एकनाथ शिंदे यांचे हे झळकलेले फ्लेक्स दिसून आले आहेत. फ्लेक्सवर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे यांचे देखील फोटो आहेत.

राम जन्मभूमी सोहळ्यानिमित्त अयोध्येमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स पाहायला मिळाले. ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेजी की कामना हुई पुरी’ असा मजकूर लिहिलेले अनेक फ्लेक्स अयोध्येतील रामघाट परिसरात उभारण्यात आलेले आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR