लोहारी सावंग्यात शेतक-याच्या कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

नागपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला भक्कम धीर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षीची दिवाळी थेट बळीराजाच्या घरी साजरी केली. कडक ऊन पडलेले असताना, उन्हाची तमा न बाळगता मुख्यमंत्र्यांनी रविवारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि ‘सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे’ असा ठाम विश्वास शेतक-यांना दिला.

मुख्यमंत्र्यांनी ७ नोव्हेंबरच्या सायंकाळीच नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा हे गाव गाठले. तेथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी घरातील महिलांनी बनवलेली भाकर, चपाती, आलू-वांग्याची भाजी, वांग्याचे भरीत, वालाच्या शेंगांची भाजी आणि वरण-भाताचा मुख्यमंत्र्यांनी अत्यंत साधेपणाने आस्वाद घेतला. जेवणानंतर रात्री ते ग्रामस्थांसोबत भजनात सहभागी झाले.

आजवर एकाही मुख्यमंत्र्याला आम्ही डोळ्यांनी पाहिले नव्हते; पण फडणवीस साहेबांनी थेट आमच्या गावात मुक्काम करून आम्हाला आनंदाचा सुखद धक्का दिला, अशी भावना लोहारी सावंगा येथील महिलांनी व्यक्त केली. राज्यातील लाडक्या बहिणींच्या पाठीशी देवाभाऊ नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहेत. आमच्या छोट्याशा गावात त्यांनी दिवाळीत केलेला मुक्काम हीच आमच्यासाठी सर्वात मोठी भाऊबीज भेट आहे, अशा शब्दांत महिलांनी आपला आनंद व्यक्त केला.

भर उन्हात मुख्यमंत्र्यांची शेतात पाहणी
मुक्कामानंतर रविवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी परिसरातील सिंचन प्रकल्पांना भेटी दिल्या. सोनेगाव रिठी येथील शेतकरी दिलीप सरोदे यांच्या शेतात जाऊन त्यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतक-यांच्या अडचणी समजून घेतल्या.

विंधन विहिरींवरील बंदी १५ डिसेंबर पर्यंत शिथील : फडणवीस यांची घोषणा
सध्याची दुष्काळी स्थिती पाहता विशेष बाब म्हणून केवळ शेतीकामाकरीता विंधन विहिरींवरील बंदी येत्या १५ डिसेंबर पर्यंत उठविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी केली. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे आज सकाळी मुख्यमंर्त्यांनी विविध ग्रामपंचायत सरपंचांशी संवाद साधला. फडणवीस यांनी शनिवारी या गावात मुक्काम करून येथेच दिवाळी साजरी केली.

रविवारी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी पुढील दौ-यावर निघण्यापूर्वी त्यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यंदा दुष्काळामुळे जलसंकट असून, शेतातील पिके मातीमोल होण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विंधन विहिरींचे खोलीकरण किंवा नवीन विंधन विहिरी करणे यावरील बंदी उठविणे सरकारसाठी थोडे अडचणीचे आहे, मात्र विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. मात्र यासाठी शेतक-यांना परवानगी घ्यावी लागेल तसेच बंदी उठविण्याचा निर्णय सरसकट नाही, झाडे जगविण्यासाठी आवश्यक तेथेच परवानगी असेल, असेही मुख्यमंर्त्यांनी स्पष्ट केले

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39

Latest news