31.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयतेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावले

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावले

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित फेक व्हीडीओ प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्थ रेड्डी यांना दिल्ली पोलिसांच्या सायबर युनिटनं नोटीस पाठवली आहे. यासंबंधी चौकशीसाठी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे.

आरक्षण आणि त्यासंबंधीचा अमित शहांचा एक कथित वादग्रस्त व्हीडीओ नुकताच व्हायरल झाला होता. हा व्हीडीओ फेक असल्याचे काही फॅक्ट चेकमधून समोर आले आहे. हा व्हीडीओ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्थ रेड्डी यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिट अर्थात सायबर युनिटने रेड्डी यांना समन्स पाठवलें असून १ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्ली पोलिसांनी आपल्या समन्समध्ये रेड्डी यांना आदेश दिलेत की, रेवन्थ रेड्डी यांनी ट्विटरवर अमित शहांचा व्हीडीओ आपल्या ज्या मोबाईल फोनवरुन अपलोड केला, त्या फोनसह रेड्डी यांनी चौकशीसाठी हजेरी लावावी असे या समन्समध्ये म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR