36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसोलापूर३२ जणांच्या हद्दपारीचा आदेश न्यायालयाने वैध ठरवला

३२ जणांच्या हद्दपारीचा आदेश न्यायालयाने वैध ठरवला

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस आयुक्तांनी ३२ जणांना शहरातून हद्दपार करण्याचा दिलेला आदेश न्यायालयाने वैध ठरवत माजी नगरसेवकांसह सर्वांची याचिका फेटाळली आहे.

अजहर रामपुरे, रियाज हुंडेकरी, मोहसीन बागवान, मनोद्दीन हत्तुरे, वाहिद विजापुरे, इलियास हुंडेकरी, गाझी जहागीरदार, वाजीद सालार, असिफ तुळजापुरे, कमरुल शेख, मोहसीन नदाफ, सादिक कुरेशी, अलीमुद्दीन कुरेशी, अल्ताफ कुरेशी, इब्राहिम कुरेशी, मतीन शेख, मोहम्मद उस्ताद, तौफिक शेख, सोहेल कुरेशी, इरफान शेख, तौफिक हत्तुरे, अंबादास करगुळे, गौस नालबंद, आरिफ नालबंद, मैनोद्दिन नाईकवाडी, अबूबकर नाईकवाडी, तौसीफ नाईकवाडी ऊर्फ सय्यद, शहानवाज नाईकवाडी ऊर्फ सय्यद, उमर नाईकवाडी, अबुरिहान नाईकवाडी व मकबूल नाईकवाडी अशी त्या ३२ जणांची नावे आहेत.

सहायक पोलीस आयुक्तांनी ३२ जणांना २८ एप्रिल रोजी सकाळी सात ते सात मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शहरात वास्तव्य करू नये किंवा प्रवेश करू नये, निवडणुकीच्या काळात सोलापूर शहर परिसरातून हद्दपार केल्याचा आदेश पारित केला होता. या आदेशाविरुध्द सर्वांनी न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. जिल्हा सरकारी वकिलांनी हजर होऊन यामध्ये आपली बाजू मांडली. त्यात त्यांनी पोलिसांनी आरोपींविरुध्द जे हद्दपार करण्याबाबतचे आदेश दिले आहेत ते योग्यच आहेत.

सर्व आरोपींवर एक व एकपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने तो युक्तिवाद ग्रा धरून सर्व आरोपींचा अर्ज फेटाळला. यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपींच्यावतीने अ‍ॅड. राहुल रुपनर, अ‍ॅड. पी. पी. नवगिरे, अ‍ॅड. जे. ए. दर्जी, अ‍ॅड. रियाज शेख, अ‍ॅड. अजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR