27.9 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसोलापूरसीएनजीसाठी सोलापुरात कारच्या रांगा

सीएनजीसाठी सोलापुरात कारच्या रांगा

सोलापूर : उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने सोलापुरात धार्मिक पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकजण आपल्या खासगी वाहनाने प्रवास करीत असल्याने सध्या स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधन म्हणून सीएनजीचा वापर वाढत आहे. यामुळेच अनेक शहरातील अनेक पंपांवर सीएनजीच्या रांगा पाहायला मिळत आहेत.

सोलापूर शहरात २०२१-२२ मध्ये पहिले सीएनजी पंप सुरू झाले होते. त्यानंतर दोन वर्षांतच सीएनजीच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे पंपही वाढले. सध्या शहर व शहराच्या सीमेलगत तब्बल १८ सीएनजी पंपांची संख्या झाली आहे; पण तरीही सगळ्याच पंपांवर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. सोलापुरातील एका पंपावर दिवसातून जवळपास एक हजार किलो सीएनजीची विक्री होते पण मागणीएवढा पुरवठा होईना. ज्या पेट्रोलपंपावर सीएनजी उपलब्ध असतो त्या पंपावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

सध्या पर्यटन वाढल्याने सीएनजीची मागणी वाढली आहे. यामुळे अनेक पंपांवर वाहनांच्या रांगा दिसत आहेत; पण अनेक पंपांवर मागणीएवढा वेळेवर पुरवठा होईना. यामुळे वाहनचालकांना रांगेत थांबावे लागते. शिवाय यातून वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात. शिवाय यातून डिलरला तुटपुंजे कमिशन मिळत आहे. हे कमिशन वाढवून द्यावे, अशी डिलर्सची मागणी आहे.

सध्या पेट्रोल हे १०४ रुपये लिटर आहे. तर सीएनजी ९० रुपये किलो आहे. एक गाडीला सीएनजी भरण्यासाठी पाच ते सात मिनिटे लागतात. यात जवळपास सात किलोपर्यंत सीएनजी भरले जाते. सोलापुरात सीएनजी ९० किलो आहे, तर इतर जिल्ह्यांत जवळपास ८८ रुपये किलो आहे. सोलापूर जिल्ह्यात येणारा सीएनजी गॅस पुण्याहून मागविला जातो. थेट पाईपलाईन नसल्याने दर वाढल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR