34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगेंच्या भेटीला आलेल्या आरोग्यसेविकेला कोसळले रडू

जरांगेंच्या भेटीला आलेल्या आरोग्यसेविकेला कोसळले रडू

जालना : मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठा लढा उभारला आहे. मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषण करत आहेत. त्यांच्या या तिस-या टप्प्यातील उपोषणचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या भेटीसाठी आरोग्यसेविका पोहोचल्या. यावेळी जरांगे पाटील यांना उपचारांची गरज असल्याचे म्हटले. पण हे सांगत असतानाच त्या आरोग्यसेविकेला आपले अश्रू रोखता आले नाहीत. त्यांना रडू कोसळले. रडत रडत त्यांनी मनोज जरांगे यांना उपचारांची गरज असल्याचे म्हटले.

मनोज जरांगे हे उपोषणाना बसलेत. त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून लोक येत आहेत. अशात एक आरोग्यसेविका त्यांना भेटण्यासाठी आली. तेव्हा मनोज जरांगे यांची अवस्था पाहून त्यांना रडू कोसळलं. मी इथंच जीव देईन, माझ्या भावाचा इलाज केल्याशिवाय मी घरी जाणार नाही, असं म्हणत त्या रडू लागल्या.

ठरवले तर सरकार बैठक घेईन निर्णय घेऊ शकतं. पण सरकार तसे करत नाही. सरकारला माझ्या भावाला सिरियस करायचे आहे. सरकार मनोज जरांगे पाटील यांना असे निपचित पडलेले बघू शकते. पण मी माझ्या भावाला असे बघू शकत नाही. मनोज जरांगे जरी माध्यमांशी बोलत असले तरी त्यांची प्रकृती खालावते आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. मी कुणाचंही ऐकणार नाही. त्यांनी मला मारले तरी चालेल. मी त्यांचा मार खाईन. पण मी त्यांना दवाखान्यात घेऊन जाणार. त्यांना आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट करणार, असं त्या आरोग्यसेविका यांनी म्हटले.

मराठा आरक्षणचा लढा देणा-या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावते आहे. काल माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांच्या हातून माईकही खाली पडला. सध्या मनोज जरांगे हे उपोषण स्थळी झोपून आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR