बिबट्याने पुन्हा घेतला शेतकरी महिलेचा बळी

वरवंड : कडेठाण (ता. दौंड) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतात काम करणा-या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.७) सायंकाळी घडली. लताबाई बबन धावडे (वय ५०, रा. कडेठाण) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, घटनास्थळी वनविभागाच्या अधिका-यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी अधिका-यांना धारेवर धरले.

दौंड तालुक्यात बिबट्याने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. भीमा नदीच्या पट्ट्यात असलेल्या दौंड तालुक्यातील कानगाव, हातवळण, नानगाव, कडेठाण तर शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, गणेगाव, सादलगाव, वडगाव रासाई या भागात बिबट्याने तांडव केले आहे. शेतक-यांच्या पाळीव जनावरांची शिकार करणारा बिबट्या आता माणसाचीही दिवसाढवळ्या शिकार करू लागला आहे.

जी भीती शेतक-यांना आणि नागरिकांना होती, ती भीती आता खरी ठरू लागली आहे. वनविभागाच्या निष्कर्ष आणि हलगर्जीपणामुळे दौंड तालुक्यात दोघांचा निष्पाप बळी गेला आहे. शनिवारी कडेठाण हद्दीत सायंकाळी लताबाई धावडे या स्वत: च्या शेतात काम करत होत्या. तर परिसरात अन्य काही शेतकरी शेतीची कामे करत होते. दरम्यान, लताबाई धावडे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात फरफटत नेले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एका मजुराच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा केल्याने उघडकीस आली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news