मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटातील संघर्ष टोकाला गेला आहे. अजित पवार गटालाच निवडणूक आयोगाकडून पक्ष आणि चिन्ह देण्यात आल्यानंतर दोन्ही गटांमधील संघर्ष आणखी टोकाला गेला आहे. त्यामुळे अजित पवार यांना सातत्याने शरद पवार गटाकडून टार्गेट केले जाते, तर अजित पवार गटाकडूनही शरद पवार गटावर हल्लाबोल सुरु आहे.
हा संघर्ष सुरु असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलना थेट सरड्याशी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या ट्विटर हँडलवर अजित पवार यांचा व्हीडीओ शेअर करून ही तुलना करण्यात आली आहे. अजित पवार हे आज कोल्हापूर दौ-यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना महायुती सरकार असा उल्लेख करताना ते अडखळल्याचे दिसून आले. यानंतर त्यांच्या तोंडून महाविकास आघाडी उसा उल्लेख झाला.
आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी सरडा आपला रंग बदलतो पण सारखा रंग बदलताना आपण आत्ता नक्की कुठे आहोत ह्याचं भान मात्र त्याला राहत नाही. अजित पवारांच्या तोंडी महविकास आघाडीचं नाव येणं हा त्यातलाच प्रकार आहे. तोच अजित पवार यांचा अडखळलेला व्हीडीओ शेअर करून थेट सरड्याची उपमा देण्यात आली. व्हिडिओ करून शेअर म्हटले आहे की, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी सरडा आपला रंग बदलतो पण सारखा रंग बदलताना आपण आत्ता नक्की कुठे आहोत याचं भान मात्र त्याला राहत नाही. अजित पवारांच्या तोंडी महविकास आघाडीचे नाव येणे हा त्यातलाच प्रकार आहे. उपमुख्यमंत्री जरा सांभाळून, घार घिरट्या घालतेच आहे!!
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी बारामती लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना पातळी ओलांडली होती. यानंतर विरोधी पक्षनेते जितेंद आव्हाड यांनी अजित पवार यांच्या घणाघाती प्रहार केला होता. यानंतर अजित पवार यांनी आपण जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला, अशी सारवासारव केली होती.