चूक एनटीएची, पण शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता (यूजीसी-नेट) चाचणीच्या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) केली. नीट नंतर एनटीएवर यंदाच्या वर्षात दुस-यादा अशी नामुष्की ओढवली असून यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला.

मोदी, तुमच्या एनटीएने नुकतेच काय केले आहे ते जरा पाहा. यूजीसी-नेटच्या समाजशास्त्र, इंग्रजी आणि वाणिज्य या विषयांच्या परीक्षा २२ ते ३० जूनदरम्यान घेण्यात आल्या. जवळपास दोन महिन्यांनंतर एनटीएने या तिन्ही परीक्षा रद्द केल्या, कारण त्यांच्याकडून चुकीची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आणि जुन्या प्रश्नांची पुनरावृत्ती करण्यात आली. हजारो उमेदवारांनी अनेक वर्षे तयारी केली, अर्ज भरले, शुल्क भरले, दूरच्या परीक्षा केंद्रांवर प्रवास केला. आता त्यांना सप्टेंबरमध्ये पुन्हा हे सगळे करावे लागणार आहे.

चूक एनटीएची, पण शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. मी हे कोटामध्ये, डेहराडूनमध्ये, प्रयागराजमध्ये सांगितले आहे आणि पुढेही सांगत राहीन. ही आता शिक्षणव्यवस्था राहिलेली नाही. हे एक एक्स्ट्रॅक्शन मशीन बनले आहे. ते तुमचे पैसे, तुमची वर्षे, तुमचे मानसिक आरोग्य आणि तुमचा आत्मविश्वास हिरावून घेते आणि बदल्यात काहीच देत नाही. नोकरीसुद्धा नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच परीक्षा होण्यापूर्वीच या प्रश्नपत्रिका लीक झाल्या होत्या का? या प्रश्नाचे उत्तरही एनटीएने दिलेले नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

सरकारला चूक अमान्य
मोदी सरकारच्या इतर प्रत्येक यंत्रणेप्रमाणेच एनटीए देखील कधीही स्वत:ची चूक मान्य करत नाही आणि इतर प्रत्येक पेपरफुटीच्या प्रकरणाप्रमाणेच, यामध्येही कोणाचीही जबाबदारी निश्चित केली जाणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही पहिली पायरी होती, शेवटची नाही. एनटीएच्या नेतृत्वालाही जबाबदार धरले पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.

पुन्हा नामुष्की
सप्टेंबरमध्ये पुन्हा ही परीक्षा देणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला, तुमची काहीही चूक नाही. पंतप्रधान मोदींनी अशी व्यवस्था उभी केली आहे जी एक परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही आणि त्यानंतर त्याच परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांनाच दोष देते. तुमची वर्षे हिरावून घेतली जात आहेत आणि जोपर्यंत पंतप्रधान मोदी याचे उत्तर देत नाहीत, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा हुंकारही राहुल गांधी यांनी भरला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news