22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयतेलंगणाची अधिकृत राजधानी आता हैदराबाद

तेलंगणाची अधिकृत राजधानी आता हैदराबाद

आंध्रप्रदेशची राजधानी राहणार नाही हैदराबादवर तेलंगणाचे नियंत्रण असणार

हैदराबाद : ६ जूनपासून हैदराबाद तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची अधिकृत संयुक्त राजधानी राहणार नाही. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ च्या कलम ५(१) नुसार, २ जून २०२४ पासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांची समान राजधानी असेल. याच कायद्याच्या कलम ५(२) मध्ये हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी असेल आणि आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असणार आहे.

आंध्र प्रदेशला अद्याप कायमस्वरूपी राजधानी नाही. अमरावती आणि विशाखापट्टणमचा लढा अजूनही न्यायालयात सुरू आहे. आंध्रचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले की, ते सत्तेत राहिल्यास ते विशाखापट्टणमला प्रशासकीय राजधानी बनवू. त्याच वेळी, अमरावती हे विधिमंडळाचे स्थान असेल आणि कर्नूल ही न्यायालयीन राजधानी असेल. २०१४ मध्ये विभाजन झाल्यानंतर आंध्र प्रदेशने हैदराबादची राजधानी म्हणून वापर करणे बंद केले. दोन तेलुगू राज्यांमधील नवीन विभाजन प्रतीकात्मक असेल, पण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना रविवारी होणा-या राज्य स्थापना दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. रेड्डी यांनी शनिवारी राजभवनाला भेट दिली आणि राज्यपालांना २ जून रोजी होणा-या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्कही होते. सिकंदराबाद येथील परेड ग्राउंड आणि टँक बंड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राज्य सरकारने विस्तृत व्यवस्था केली होतीे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR