40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयरुग्ण फक्त विचार करून कम्प्युटर नियंत्रित करणार

रुग्ण फक्त विचार करून कम्प्युटर नियंत्रित करणार

न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्कने मोठा दावा केला आहे. न्यूरालिंकने या वर्षी जानेवारीमध्ये सर्जिकल रोबोटच्या सहाय्याने पहिल्या रुग्णाच्या मेंदूमध्ये एक चिप प्रत्यारोपित केली. हा रुग्ण फक्त विचार करून कम्प्युटरचा माऊस हलवू शकतो असा दावा इलॉन मस्कने केला आहे. तो पेशंटही सध्या पूर्णपणे ठिक आहे. तसेच ब्रेन चीपच्या त्यावर कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत.

अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कची कंपनी न्यूरांिलकने गेल्या महिन्यात पहिल्यांदा रुग्णाच्या मेंदूमध्ये एक चिप प्रत्यारोपित केली होती. आता तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे आणि केवळ त्याच्या विचाराने संगणक माऊस वापरण्यास सक्षम आहे. आता न्यूरांिलकच्या माध्यमातून या रुग्णाकडून माऊसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे या रुग्णाकडून जास्तीत जास्त माऊस क्लिक केले जात आहे. इलॉन मस्कने हा दावा जरी केला असला तरीही कंपनीकडूनच या यशाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. न्यूरांिलकला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यूएस एफडीएकडून मानवांमध्ये ब्रेन-चिप चाचण्या करण्यासाठी परवानगी मिळाली होती.

रोबोटने चिप बसवली होती
या प्रयोगासाठी न्यूरांिलकने काही स्वयंसेवकांची निवड केली होती. यापैकी एका रुग्णाच्या मेंदूवर रोबोटने ब्रेन चिप बसवली होती. हे मेंदूच्या त्या भागात प्रत्यारोपित केले गेले होते जे आपल्या हालचाल करण्याच्या विचारावर नियंत्रण ठेवते. रुग्णांना केवळ विचार वापरून कम्प्युटर कर्सर किंवा कीबोर्ड नियंत्रित करण्यास सक्षम करणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय आहे.

२०३० पर्यंत मेंदूत चिप बसविणार
इलॉन मस्कच्या दाव्यानुसार, कंपनीला यामध्ये काही प्रमाणात यश मिळाले आहे. २०३० पर्यंत २२ हजार लोकांमध्ये ब्रेन चिप्स प्रत्यारोपित करण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. या मेंदूच्या चिपच्या मदतीने लठ्ठपणा, नैराश्य आणि स्किझोफ्रेनियासारख्या मानसिक स्थितींवर उपचार करता येतात.

न्यूरालिंक काय आहे?
न्यूरालिंक ही एलॉन मस्क यांची कंपनी आहे. एलॉन मस्क यांच्यासोबत सात वैज्ञानिकांच्या टीमने न्यूरांिलक कंपनीची स्थापना केली. २०१६ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. न्यूरालिंककडे ४०० हून अधिक कर्मचारी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR