29.8 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयपिकअप उलटले; १४ ठार

पिकअप उलटले; १४ ठार

मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

भोपाळ : मध्य प्रदेशातील डिंडोरीमध्ये भीषण अपघात झाला आहे. त्यात १४ जणांना मृत्यू झालाय तर २० जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बडझर घाटात हा दुर्दैवी अपघात घडला. पिकअप वाहन अनियंत्रित होऊन पलटले. त्यामुळे ही घटना घडली.

अपघात इतका भीषण होता की १४ जणांचा जागीच मृत्यू झालाय. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. एक्सवर पोस्ट करुन त्यांनी यासंदर्भातील माहिती दिलीये.

मिळालेलेल्या माहितीनुसार, सर्वजण एक कार्यक्रम करुन घरी परतत होते. जखमींना शहपुरा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काही जणांची स्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. दिंडोरीच्या जिल्हाधिका-यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR