22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीय५० हजार योजनादूत नेमण्याची प्रक्रिया सुरू

५० हजार योजनादूत नेमण्याची प्रक्रिया सुरू

तरुणांना दरमहा १० हजार कमावण्याची संधी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दलित, महिला, आर्थिक दुर्बल, शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी सरकारतर्फे वेगवेगळ््या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारकडून मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना प्रतिमहिना १० हजार रुपये मिळविण्याची संधी आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शेवटचे सहा दिवस शिल्लक आहेत.

राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणा-या योजना सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी सरकारने मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत सरकारकडून काही तरुण-तरुणींची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या योजनादूतांना सरकारच्या योजना सामान्यांना समजावून सांगायच्या आहेत. या कामासाठी सरकारतर्फे त्यांना प्रतिमहिना १० हजार रुपये दिले जाणार आहेत. निवड झाल्यानंतर ६ महिन्यांसाठी तरुणांना हे मानधन दिले जाणार आहे. सरकार राज्यभरातून अशा ५० हजार योजनादूतांची निवड करणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

अर्ज करण्यासाठी शेवटचे सहा दिवस
या उपक्रमात सहभागी होऊन प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये कमवण्याची तरुणांना उत्तम संधी आहे. त्यासाठी इच्छुकांना १३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर अर्ज करण्याची संधी दिली जाणार नाही. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. तसेच उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे तसेच त्याला संगणकाचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR