मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला, त्यानंतर पक्षातील अनेकांनी राजीनामा दिला आणि राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका पटली नसल्याचे सांगितले. या दरम्यान आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना भूमिका बदलली नाही. धोरणावर कायम असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्याचे कारण देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. पहिल्या पाच वर्षात जे पटले नाही त्याचा विरोध केला आहे. लोकं म्हणतात की, राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे. भूमिका बदलली नाही. धोरणावर कायम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींचे नेतृत्व खंबीर असल्याने पाठिंबा दिला. मोदी नसते तर राम मंदिर उभे राहिले नसते. १९९२ पासूनची मागणी पूर्ण झाली. राम मंदिर मोदींच्या काळात पूर्ण झाले हे वास्तव आहे असे कारण राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्यावर दिले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा सभेत महायुतीला पाठिंबा दिला होता.
राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर अनेक मनसे सैनिकांनी समर्थन दिले तर अनेकांनी नाराजी जाहीर करत राजीनामे देखील दिले. राज ठाकरेंनी भूमिका बदलल्यामुळे मनसे सैनिक नाराज असल्याचे दिसून येत होते. यावर आज राज ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. पाच वर्षात अनेक बदल झाले, त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. राम मंदिर निर्माण, ३७० कलम असे अनेक निर्णय चांगले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले. पाठिंबा देताना मला पक्षाचा विचार करावा लागतो. ज्यांना ही भूमिका पटत नाही, ते निर्णय घ्यायला मोकळे आहेत, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या पदाधिका-यांना दिली आहे.