40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeराष्ट्रीयकंगना विरोधात मंडीतून काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह

कंगना विरोधात मंडीतून काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह

मंडी : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून भाजपने अभिनेत्री कंगना रणौतला उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान कंगना रणौत विरोधात काँग्रेस मधून कोण उमेदवार दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिभा सिंह यांनी मंडी येथून त्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह निवडणूक लढवतील अशी घोषणा केली आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी देखील याचे संकेत दिले असून दिल्लीतील सीईसी बैठकीत देखील विक्रमादित्य सिंह यांच्या नावाची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. सीएम सुक्खू यांनी सांगितले की मंडी येथून आम्ही युवा नेत्याला संधी देणार हे निश्चित आहे. तसेच प्रतिभा सिंह यांनी सांगितले की विक्रमादित्य सिंह यांना मजबूत उमेदवार मानले जात आहे. सध्या प्रतिभा सिंह या मंडी येथून खासदार आहेत.

यावेळी प्रतिभा सिंह म्हणाल्या की आम्हाला फरक पडत नाही की कंगना काय करतेय आणि काय म्हणतेय. मंडीमध्ये लोक नेहमी आमच्यासोबत राहिले आहेत. मी कठीण परिस्थितीमध्ये येथे निवडणूक जिंकली होती. प्रतिभा सिंह यांनी आपण आगामी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा यापूर्वीच केली होती. आता त्यांच्या मुलाने येथून निवडणूक लढावी अशी त्यांची इच्छा आहे.

तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपने कंगना रणौतला उमेदवार घोषीत केले आहे. कंगना यानंतर मैदानात उतरल्याचे पाहायाला मिळत असून जोरदार प्रचार करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR