28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारला पाच राज्यांच्या निवडणुकांची चिंता

राज्य सरकारला पाच राज्यांच्या निवडणुकांची चिंता

संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुंबई : मोदी सरकार विरोधकांचा आवाज भाजपा दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. जे भाजपसोबत जात आहेत त्यांची संपत्ती जप्त केली जात नाही, परंतु मोदी आणि शहांच्या विरोधात जे जात आहेत त्यांना मुद्दामहून त्रास दिला जात आहे. महाराष्ट्र जळतोय याचे यांना काही पडलेले नाही. राज्य सरकारला पाच राज्यांच्या निवडणुकांची चिंता लागली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत की नाहीत? की त्यांना डांबून दुसरा कोणी गृहमंत्रालय चालवतोय असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, पाच राज्यांतील निवडणुकांचा प्रचार शिगेवर असताना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीने ७५० कोटींची मालमत्ता जप्त केल्याच्या प्रकरणावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. जे भाजपासोबत जात आहेत त्यांची मालमत्ता जप्त होते. मी स्वत:ही एक व्हिक्टिम आहे. इक्बाल मिर्चीसह इतरांच्या प्रॉपर्टी मोकळ्या होत असताना सरकार विरोधकांच्या प्रॉपर्टी जप्त करीत आहे. पाच राज्याच्या प्रचारात राहुल गांधी व्यस्त असताना असा प्रॉपर्टी जप्त करून त्रास देण्याचा प्रयत्न पाच राज्यांतील पराभवाच्या भीतीनेच भाजपा सरकार करीत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

गृहमंत्रालयाची ही विकृती
शिवतीर्थावर शिवसैनिक आंदोलकांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करणे ही गृहविभागाची विकृती आहे. शिवतीर्थावर गद्दारांना रोखण्याचा प्रयत्न झाला तर तुम्ही विनयभंगाचे गुन्हे दाखल करता. त्या महिलांची भाषा पाहा. गृहमंत्रालयाने यावर तोडगा काढला नाही तर आम्ही न्यायालयात आणि रस्त्यावर ही लढाई लढू असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR