27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाआज रंगणार विश्वचषकाचा महामुकाबला!

आज रंगणार विश्वचषकाचा महामुकाबला!

- अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत - ऑस्ट्रेलिया सामना रंगणार

अहमदाबाद : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक २०२३ चा महाअंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान आहे.
साबरमती नदीच्या काठावर बनवलेले नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. रविवारी या मैदानावर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियम विश्वातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १,३२००० प्रेक्षक सामना पाहू शकणार आहेत. याआधी ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे जगातील सर्वात मोठे मैदान होते, पण आता या स्टेडियमने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला मागे टाकले आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमचा इतिहास
अहमदाबादमधील हे स्टेडियम हे मोटेरा स्टेडियम नावानेही ओळखले जाते. हे मैदान १९८२ मध्ये पूर्ण झाले. पण, त्यावेळी मैदानात केवळ ४९ हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता होती. २०१५ साली पंतप्रधान आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी स्टेडियम पुन्हा नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला. २०२० मध्ये स्टेडियम पूर्ण झाले. आता या स्टेडियममध्ये १,३२००० चाहते सामना पाहू शकतात. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे जगातील सर्वात मोठे मैदान होते, ज्यावर ९० हजार चाहत्यांना सामना पाहण्यासाठी व्यवस्था होती.

नरेंद्र मोदी स्टेडियमची खास वैशिष्ट्ये
हे मैदान सुमारे ६३ एकरमध्ये पसरलेले आहे, याला ४ गेट आहेत. याशिवाय नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ४ ड्रेसिंग रूम आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सरावासाठी ६ इनडोअर खेळपट्ट्या आहेत, तर ३ मैदानी खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत. या स्टेडियममध्ये क्रिकेट अकादमी आहे. या स्टेडियममध्ये चाहत्यांच्या बसण्यासाठी केलेली व्यवस्था उत्तम आहे.

मुंबईहून अहमदाबादकडे खास रेल्वेची सोय
मध्य रेल्वेनुसार, उद्याचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींसाठी रेल्वेची खास सोय ही केली आहे. ही खास रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल. शनिवारी रात्री १०.३० वाजता सुटणार आहे. ही रेल्वे सकाळी ६.४० वाजता अहमदाबाद येथे पोहचेल. आयसीसी वर्ल्डकपचा अंतिम सामना दुपारी २ वाजता सुरु होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी ०१.४५ वाजता ही रेल्वे अहमदाबाद येथून निघेल आणि १०.३५ वाजता मुंबईत पोहचेल. ही रेल्वे दादर, ठाणे, वसई रोड, सूरत आणि बडोद्यात थांबेल.

विमानाच्या तिकिटाचे दर गगनाला
अहमदाबाद येथील हॉटेलचे भाडे गगनाला पोहचले आहे. विमानाच्या तिकिटाचे दर पण खूप वाढले आहेत. बेंगळुरु-अहमदाबाद या प्रवासाचे एरव्ही भाडे जवळपास ६,००० रुपये होते. पण शनिवारी याच मार्गावरील तिकिटाचे दर ३३,००० रुपयांवर पोहचले. तर दुस-या शहरातून अहमदाबादसाठी सुरु असलेल्या फ्लाईट्सच्या तिकिटात पण जबरदस्त वाढ झाली आहे. अनेक पटीने हे दर वाढले आहेत. दिल्ली ते अहमदाबाद विमानाचे दर एरव्ही ४,००० रुपये आहेत. तर मेकमायट्रिपनुसार सध्या हे दर २०,०४५ रुपयांच्या घरात पोहचले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR