27.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्र७० वर्षांचा आमचा बॅकलॉग कसा भरून काढणार?

७० वर्षांचा आमचा बॅकलॉग कसा भरून काढणार?

मनोज जरांगेंचा सरकारला सवाल

सातारा : मराठा आरक्षणासाठी लेकरे उन्हात आहेत तुमच्याबरोबर मी देखील उन्हात आहे. घाबरून घरात बसलो तर आरक्षण कसे मिळणार? ७० वर्षापासून पिढ्या बरबाद झाल्या. आरक्षण असतानाही आरक्षण मिळाले नाही. मराठे कुणबी नाही मग आता कशा सापडल्या? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केले आहे. ७० वर्षांचा आमचा बॅकलॉग सरकार कसा भरून काढणार आहे. आरक्षण असताना आम्हाला का दिले गेले नाही? आमच्या लेकरांनी असे काय पाप केले असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी लढत असलेल्या मनोज जरांगेंच्या सभांचा धडाका सध्या सुरुच आहे. दरम्यान आज जरांगेंची साता-यात सभा झाली. या सभेला सातारा शहराबरोबर पंचक्रोशीतील मराठा बांधव हजर होती. दरम्यान आज साता-याचे खासदार छ. उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचीही मनोज जरांगे भेट घेणार आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जाणून बुजून षडयंत्र रचले जात आहे. आंदोलनानंतर आता पुरावे मिळायला लागले. ७० वर्षापूर्वी आरक्षण दिले असते तर आज ही वेळ आली नसती. आज मराठ्यांच्या लाखाने नोंदी सापडायला लागल्या आहेत. मराठ्यांना लढायचे माहिती आहे. त्यावेळी पुरावे नाही सापडत म्हणाले आता पुरावे कसे सापडायला लागले. ज्याने लपवले त्यांची नाव समोर आले पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले.

आपला विजय निश्चित
मनोज जरांगे म्हणाले, २४ डिसेंबरला आपला विजय निश्चित आहे. मराठ्यांनो गाफिल राहू नका. नाहीतर लेकरांचे नुकसान करायला तुम्ही जबाबदार असाल. हैदराबादला समिती नोंदी शोधण्यासाठी गेली. या समितीचा सरकारने अहवाल स्विकारला. ज्या नोंदी मिळतील त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळणार आहे. परंतु मी दोन भावांमध्ये भेद करू शकत नाही, साता-यात २० हजार नोंदी सापडल्या आहेत. यातच आपले यश आहे. नोंदी नसतील त्याच नोंदीच्या अहवालावर २४ तारखेला सरसकट आरक्षण देणार सांगितले म्हणून उपोषण मागे घेतले.

घटनेच्या पदावर बसलेल्याने कायदा तुडवला
मराठा आरक्षणाचा लढा आपल्यालाच लढायचे आहे. जेवढे पक्ष झाले त्या पक्षातील एकही नेता मदतीला यायला तयार नाही. त्या नेत्यांना मराठ्यांनी किंमत द्यायची नाही. घटनेच्या पदावर बसलेल्याने कायदा तुडवला आहे असे म्हणत जरांगेंनी छगन भुजबळवर टीका केली आहे. महाराष्ट्राला यशवंतरावानी वेगळी संस्कृती दिली. महात्मा फुलेंचा आदर्श ठेवायला पाहिजे होते. मराठा आणि ओबीसीं मध्ये तेढ निर्माण होऊ देऊ नका. तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. जातीय दंगली घडवून आणायचा डाव आहे, असे जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR