17.5 C
Latur
Tuesday, November 25, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरधनंजय मुंडेंएवढा नीच माणूस पृथ्वीवर असूच शकत नाही

धनंजय मुंडेंएवढा नीच माणूस पृथ्वीवर असूच शकत नाही

मनोज जरांगेंचा संताप

जालना : परळीमध्ये आयोजित एका प्रचारसभेमध्ये धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली आहे. जगतमित्र हे कार्यालय सर्वांसाठी खुले असायचे, आताही हे कार्यालय सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. काही असेल नसेल, जगतमित्र कार्यालयामधून आपण गोरगरिबांना मदत करायचो, कार्यालय सुरू आहे, गोरगरिबांना मदत सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

धनंजय मुंडे असे काही बोलले असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस नाही, संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धनंजय मुंडे इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो, जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचे समर्थन कधीच करू नये. अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजूनही अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरे होईल. गोरे गरिबांचे मुडदे पाडणा-यांना अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचे? असे थेट सवालच आता मनोज जरांगे यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघडे पडले आहेत, गुंडागर्दी, भ्रष्टाचार करणे, दारू पिऊन पोरांना त्रास देणे, त्यांच्या समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळून, ब्लॅकमेल करून आपला संसार उभा करणे असे भयंकर पाप कराड करत होता आणि धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते, असा माणूस अजिबात चांगला नाही, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत, नाहीतर तुम्हीसुद्ध धनंजय मुंडे यांच्या पापात खाक होताल अशा इशाराच आता जरांगे यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR