26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी

एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबईतील अनेक पोलिस स्टेशनला निनावी मेल धमक्यांना घाबरत नाही : शिंदे

मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची, शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ई-मेल पोलिसांना आले असून हे ई-मेल पाठणा-यांचा कसून शोध घेतला जात आहे. मुंबईतल्या जवळपास ७ ते ८ पोलिस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसाकडून या मेलचा तपास सुरू आहे. मंत्रालय पोलिस, जेजे मार्ग पोलिस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे.

याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला? हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागचा उद्देश याची चौकशी सुरु आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती. मुंबई पोलिस कसून चौकशी करत आहेत. आजवरच्या कारकिर्दीत अनेक वेळा अशा धमक्या आल्या आहेत. त्याला मी घाबरत नाही अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी याबाबत बोलताना दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR