22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू

पुण्यात विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी
पुण्यात पावसाने अक्षरश: कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे भयंकर नुकसान झाले आहे. सिंहगड रोड परिसरातील पाच ते सहा इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. त्यातच विजेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करणा-या तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंडा भुर्जीच्या गाडीवर तीन जण काम करत होते. रात्री गाडी बंद करून आवरत असताना ही दुर्घटना घडली आहे.

मुसळधार पाऊस सुरू झाल्याने त्यांनी भुर्जीची गाडी बंद करण्याचा निर्णय घेतला. आवराआवरी करत असताना विजेचा शॉक लागला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ते ज्या भागात होते तिथे गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे त्यांना आवरतानाही अनेक अडचणी येत असाव्यात असा अंदाज आहे.

पुण्यात पावसाने कहर केला आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील काही इमारती या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे पुण्यात हाहाकार उडाला आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरांत, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. काही ठिकाणी कमरेइते, छातीइतके पाणी साचले आहे. इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेले आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकतानगर परिसर पाण्याखाली गेला आहे. विजेचा प्रवाह बंद करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR