37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रबिल्डिंगचा काही भाग कोसळल्याने तिघांचा मृत्यू

बिल्डिंगचा काही भाग कोसळल्याने तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत एक भयानक दुर्घटना घडली. येथे कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असलेल्या बिल्डिंगवरून काही भाग कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला. बोरिवली पश्चिम येथील कल्पना चावला चौक, सोनी वाडी, बोरिवली पक्षी येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १६व्या मजल्यावरील मचान खाली असलेल्या लोकांच्या अंगवर पडल्े. ज्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती गंभीर जखमी आहे.

या बांधकामाधीन इमारतीला २४ मजले आहेत. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली… घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, बोरीवली पोलिस आणि रुग्णवाहिका मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली. सर्व ४ जखमींना कांदिवली शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

हा अपघात नक्की कसा घडला, काय झालं. तसेच जखमी लोक तिथे काय करत होते. कन्स्ट्रक्शन साईटची सेफ्टी काय? या सगळ्याचा पुढील तपास सुरू आहे… लवकरच पोलिस या घटनेचा शोध घेतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR