34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयनायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री?

नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री?

नवी दिल्ली- हरियाणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. नायब सिंह सैनी हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. आमदारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकृतरीत्या त्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. पण, सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज चार वाजता ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

मनोहरलाल खट्टर यांनी मंगळवारी सकाळी जवळपास ११ वाजता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंदिगढमध्ये संभाव्य मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजप नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. यावेळी कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR