पालम / प्रतिनिधी
पालम तालुक्यातील चाटोरी बिट अंतर्गत शनिवार, दि. २१ रोजी सकाळी ६.३०च्या सुमारास बेकायदेशीरपणे कत्तल करण्यासाठी घेऊन जाणारे तब्बल ५० बैलासह ३ आयशर व ८ आरोपींना पोलीसांनी पकडले आहे. या कारवाई बद्दल पोलिस निरीक्षक सुरेश थोरात यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पालम तालुक्यातील चाटोरी बिट अंतर्गत ३ आयशर वाहनांमध्ये कत्तलीसाठी ५० बैल घेऊन जात असल्याची माहिती पोलीस विभागाला लागली होती. त्याच अनुषंगाने पोलीस विभागाने याच मार्गावर जाणा-या वाहन क्र. एमएच. ४६ बीएफ ०३३१ यामध्ये १८ बैल आढळून आले. एमएच २० जीसी ०६०२ या वाहनांमध्ये १५ बैल आढळले. एमएच २८ बीबी ४९८५ यामध्ये १६ बैल निदर्शनास आले. या कारवाईत एकूण ५० बैल, ३ वाहने आणि ८ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यामध्ये शेख कलीम शेख युसुफ (वय ३९) रा. लशिराबाद ता. जि. जळगाव, अखिल खान शब्बीर खान (वय ४२) रा जहागीरपुरा एरंडोल जि.जळगाव, शेख रहीम शेख सुकुर (वय ३५) रा. अनवा पाडा ता. भोकरदन जि. जालना, मुबारक शाह वजीर शाह (वय ३२) रा. बोरगाव सारवणी ता.सिल्लोड जि. छ. संभाजीनगर, वसीम मुस्तफा शेख (वय २४) रा. बोरगाव सारवणी ता. सिल्लोड जि. छ. संभाजीनगर, अरबाज महेबुब खुरेशी (वय २०) रा. बोरगाव सारवणी ता. सिल्लोड जि. छ. संभाजीनगर, रज्जाक मिरखान तडवी (वय ३८) रा. सावदा ता.रावेर जि.जळगाव, नासेर नजीर शेख (वय २२) रा. वाघारी ता. जामनेर जि. जळगाव या आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलांना शहरातील गोशाळेमध्ये दाखल करण्यात आले. पोलिस निरिक्षक सूरेश थोरात यांचे या कामगिरी बद्दल तालुक्यात कौतुक होत आहे.