31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeपरभणीबोरीकरांवर टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ

बोरीकरांवर टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ

कौसडी : बोरी शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बोरीकरांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. बोरी ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा करणा-या विहिरीची पाणी पातळी खोलवर गेल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून बोरीकरांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. गावातील हातपंप, विहिरीतील पाणी आटल्यामुळे पाण्या अभावी नागरीकांचे हाल होत आहेत.

कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. या कामावरील अधिकारी उपस्थित नसल्यामुळे ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे. गावातील अंतर्गत पाईपलाईन अपूर्ण अवस्थेत आहे. या पाणीपुरवठ्यासाठी गावाच्या बाहेर जल कुंभ बांधण्यात येत आहे परंतु हे काम अर्धवट अवस्थेत आहे. सध्या तीव्र उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. परंतु बोरी शहराला एकही टँकरने शासनाकडून पाणीपुरवठा केला जात नसल्याने नागरीकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टँकरसाठी प्रस्ताव पाठवला आहे : पुंड
बोरी गावातील पाणी टंचाई लक्षात घेता गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आपण पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याचबरोबर गावातील तीन विहिरी अधिगृहीत करण्याचा प्रस्ताव सुद्धा पाठवला आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावातील ७ ते ८ बोरचे अधिगृहन करून सध्या काही भागात नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे अशी माहिती ग्राम विकास अधिकारी विनायक पुंड यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR