22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयट्रॅक्टर ट्रॉली नदीत उलटली; १ बेपत्ता

ट्रॅक्टर ट्रॉली नदीत उलटली; १ बेपत्ता

१२ जणांना वाचवण्यात यश

बेळगाव : प्रतिनिधी
प्रवाशांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली नदीत उलटल्याची मोठी दुर्घटना बेळगावमध्ये घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील आवरादी गावाजवळ १३ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर घटप्रभा नदीत उलटला आहे. यापैकी बारा जण बचावले असून एक जण पाण्यातून वाहून गेला. ट्रॅक्टरमधून १३ जण आवरादी येथून नांदगाव येथे मजुरीसाठी निघाले होते. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून १३ जण प्रवास करत होते. घटप्रभा नदी ओलांडून दररोज हे मजूर कामावर जात होते.

प्रवाशांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली घटप्रभा नदीत उलटली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू केले आहे. पोलिसांनी नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. या दुर्घटनेतील १२ जण बचावल्याची माहिती असून एक जण अद्यापही बेपत्ता आहे. या बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे. प्रशासन बचावकार्यात गुंतलेले आहे. कुलगोड पोलिस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR