24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रदारू पिऊन पीएसआयचे वाहतूक नियमन

दारू पिऊन पीएसआयचे वाहतूक नियमन

पोलिस उपायुक्तांकडून तडकाफडकी निलंबन

पुणे : मद्यप्राशन करून कर्तव्यावर आलेल्या श्रेणी पोलिस उपनिरीक्षकावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्याचे पोलिस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. संजय सुधाकर माटेकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले.

श्रेणी पोलिस उपनिरीक्षक माटेकर हा लष्कर वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. २९ जुलै रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास तो ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या कारवाईसाठी कर्तव्यावर होता. त्याने कारवाईसाठी एक चारचाकी गाडी थांबवली. गाडीतील तिघा व्यक्तींसोबत वाद घातला. दरम्यान, यावेळी माटेकर याने दारू प्यायली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर माटेकर याच्याविरोधात कर्तव्याच्या ठिकाणी दारूचे सेवन केल्यामुळे लष्कर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माटेकर याने कर्तव्य पार पाडत असताना बेशिस्त बेजबाबदारपणाचे व पोलिस खात्याला अशोभनीय असे गैरवर्तन करून अत्यंत गंभीर स्वरुपाची कसुरी केल्याने, पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत त्याला निलंबित करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR