28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात ९ आयएएस अधिका-यांच्या बदल्या

राज्यात ९ आयएएस अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनाने ९ आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. यापैकी ७ अधिका-यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तर २ अधिका-यांची सहसहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून विविध जिल्ह्यांतील उपविभागात नियुक्ती करण्यात आली.

यामध्ये आदित्य जीवने, आयएएस (२०२१) -फेज-२ प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, भामरागड-सहसहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आली. यासोबतच श्रीमती करिश्मा नायर, आयएएस (२०२१)-फेज-२ प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभागपदी नियुक्त करण्यात आली. कवाली मेघना, आयएएस (२०२१)-फेज-२ चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सेलू उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. विनायक महामुनी, आयएएस (२०२१)-फेज-२ यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नंदुरबार उपविभागाते नियुक्ती करण्यात आली.

मिन्नु पी एम, आयएएस (२०२१)-फेज-२ यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांची भातुकाली-तिवसा उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून, राहुल कुमार मीना, आयएएस (२०२१)-फेज-२ प्रशिक्षणानंतर गडचिरोली उपविभागात प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. सत्यम गांधी, आयएएस (२०२१)-फेज-२ प्रशिक्षणानंतर देवरा उपविभागात सहायक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली. सुहास गाडे, आयएएस (२०२१)-फेज-२ च्या प्रशिक्षणानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद उपविभाग येथे नियुक्ती केली. श्रीमती मानसी, आयएएस (२०२१) फेज-२ प्रशिक्षणानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभागात नियुक्ती दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR