29.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरतुळशी विवाहाच्या साहित्यालाही महागाईचा फटका

तुळशी विवाहाच्या साहित्यालाही महागाईचा फटका

लातूर : प्रतिनिधी
दिवाळी संपताच तुळशी विवाहाचे वेध लागतात. कार्तिक शुक्ल एकादशीपासून तुळशी विवाह प्रारंभ होतो. यासाठी लागणारे साहित्य शहरातील बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. साहित्य खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरु झाली आहे. हिंदू धर्मामध्ये तसेच आयुर्वेदात औषधोपचारासाठी सर्वात बहुगुणी म्हणून मानल्या जाणा-या तुळशीला अधिक महत्त्­व असते. तर दीपावलीत तुळशीला लेक मानून तिचा मोठ्या थाटामाटात विवाह केला जातो. यामुळे कन्यादानाचे पुण्य मिळते असा समज आहे. कार्तिकी शुक्­ल एकादशीनंतर द्वादशीपासून या विवाहाला प्रारंभ होतो तर कार्तिकी पौर्णिमेस समाप्ती होते. यंदाही तुळशी विवाहाच्या साहित्याला महागाईचा फटका बसला आह.

त्यामुळे तुळशी विवाहाच्या साहित्य खरेदीसह घराघरातील वृंदावनाची साफसफाई व रंगरंगोटी करण्यात महिला व्यस्त आहेत. तुळशी विवाह सोहळयाला यंदा शुक्रवार दि.२४ पासून प्रारंभ होत आहे. यासाठी लागणारे तुळशी रोप, लाल माती, रांगोळी, फुले, हार, बाशिंग, नारळ, तोरण आदी साहित्य बाजारपेठामध्­ये उपलब्­ध असून त्­याच्­या खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. तूलशी विविहसाठी लागणा-या पूजेच्या साहित्­याचे दर वाढले असले तरीही नागरिकांकडून मोठया संख्­येने त्­याची खरेदी सुरु असल्­याचे किरकोळ विक्रेत्­यांनी सांगितले आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीच्या लग्नाची मोठी परंपरा आहे. तुळशीचे लग्न म्हणजे भगवान विष्णू आणि तुळस यांचा विवाह असतो. तुळशी विवाहानंतर ख-या अर्थाने लग्नसराईस प्रारंभ होतो. त्यामुळे दिवाळीनंतर येणा-या तुळशी विवाहाकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. तुळशी विवाहानिमित्त तुळशीची नवीन रोपे विकत घेतली जातात. घरोघरी तुळशी वृदावनाभोवताली फुलांची रांगोळी काढली जाते. तुळशीच्या या नव्या रोपाला नवीन लाल मातीत घालून त्याची रंगरंगोटी व तोरणे, पताके व फुलांनी सजावट केली जाते. आपल्याच घरातील एक लेक समजूनच तुळशीला एका नवरीसारखे सजविण्यात येते. तुळशीच्या लग्नासाठी तुळशी वृंदावन, हळदी-कुंकू, फुले, हार, अक्षदा, बाशिंग, ऊस, चिंचा, बोरे, नैवेद्य फराळ किंवा पेढे आदी साहित्य लागते.

त्यामुळे शहरातील बाजारपेठेत या साहित्याने सजली आहे. पूजा साहित्­य तुळशीचे रोप २० ते ३० रुपये, तुळशी वृदांवन २५० ते ८५० रूपये, बाश्ािंग १०० ते ३०० रुपये, पूजेची ओटी ५० रुपये, नारळ २० ते २५ रुपये, फुले ३० ते ५० रुपयेकिलो, उस २० ते २५ रूपये एक तर उस जोडी ५० रूपये, कलर रांगोळी १० ते २० रूपये पाव, पुजेची सुपारी २ रूपये,पानांचा विडा ५० ते ६० रुपये याप्रमाणे शहरातील बाजारपेठेत तुळशीच्­या विवाहासाठी आवश्­यक पूजेच्या साहित्­याची विक्रि केली जात असल्याचे किरकोळ व्यापारी ओम सुर्यवंशी यांनी सागीतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR