जळगाव : दिवाळीत सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानण्यात येते. या काळात देशभरातील सराफा पेठा गजबजलेल्या असतात. ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी असते. सोन्यात वाढ करण्याची भारतीयांची प्रथा आहे. देशात जळगावची सुवर्ण नगरी म्हणून ओळख आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या दिवाळीत सोने खरेदीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली.
या शुभ मुहूर्तावर, पाच दिवसांमध्ये सुवर्णनगरीमध्ये गर्दीचा उच्चांक झाला. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी केली. सोने खरेदीत २०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाल्याची माहिती जळगाव जिल्हा सराफ व्यावसायिक असोसिएशनचे स्वरूप लुंकड यांनी दिली आहे.
देशातील सोने खरेदीच्या एकूण उलाढालीत या सुवर्णनगरीचा मोठा वाटा आहे. गेली दोन-तीन वर्षे कोरोनाचा काळ होता.
त्याचा परिणाम सुवर्ण बाजारावर दिसून आला. उलाढाल हवी तशी झाली नाही. मात्र यंदा सुवर्णनगरीमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर सोने खरेदीमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सुवर्णनगरीत २०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली.