28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाविरोधात भारताचा थरारक विजय

ऑस्ट्रेलियाविरोधात भारताचा थरारक विजय

सूर्याचे धडाकेबाज अर्धशतक, रिंकू ठरला फिनिशर

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था
भारताचा टी २० मधील नवा फिनिशर रिंकू सिंह याने ऑस्ट्रेलियाविरोधात थरारक विजय मिळवून दिला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात रिंकूने षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक केले. भारताच्या तीन फलंदाजांना त्यांनी तंबूत पाठवले. त्यामध्ये अक्षर पटेलचाही समावेश होता. सामना फसला असे वाटत होते. पण रिंकूने आपल्या खास स्टाईलने सामना संपवला. रिंकूने षटकार ठोकत भारताला थरारक विजय मिळवून दिला.

सूर्यकुमार आणि ईशान किशन यांनी झंझावती अर्धशतके ठोकली. पण त्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतले. पण रिंकूने आपल्या खास स्टाईलने सामना संपवला. अखेरच्या षटकात तर भारताचे तीन फलंदाज बाद झाले होते. एकीकडे विकेट पडत असताना रिंकू दुस-या बाजूला खंबीर उभा होता. शेवटच्या चेंडूवर रिंकूने षटकार मारत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

सूर्या आणि ईशान किशन बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. एकापाठोपाठ एक विकेट गेल्या. तिलक वर्मा १२ धावा काढून बाद झाला. अक्षर पटेल दोन धावांचे योगदान देऊ शकला. रवि बिश्नोई आणि अर्शदीप यांना खातेही उघडता आले नाही. एका बाजूला विकेट पडत असताना दुस-या बाजूला रिंकूने फिनिशिंग केले. अखेरच्या षटकात भारताने तीन विकेट्स गमावल्या. पण रिंकून हार मानली नाही. त्याने षटकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रिंकूने १४ चेंडूत २२ धावांची खेळी केली.

सूर्याचे वादळ, रिंकूचा फिनिशिंग टच
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २०९ धावांचे आव्हान भारताने अखेरच्या चेंडूवर दोन विकेट राखून पूर्ण केले. फिनिशर रिंकूने षटकार ठोकत भारताला विजयी केले. त्याआधी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी झंझावती अर्धशतके ठोकली. ऑस्ट्रेलियाकडून तनवीर संघा याने दोन विकेट घेतल्या. जोश इंगिश याने ठोकलेल्या झंझावाती शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २०८ धावांचा डोंगर उभारला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR