27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरमतदार नोंदणीसाठी सर्व मतदान केंद्रांवर दोन दिवशीय शिबीर

मतदार नोंदणीसाठी सर्व मतदान केंद्रांवर दोन दिवशीय शिबीर

लातूर : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोग व मुख्­य निवडणूक अधिकारी यांच्या शिफारसीनुसार १ जानेवारी २०२४ या दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे संक्षिप्­त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदींच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज स्वीकारण्यासाठी नोव्हेंबरमध्ये ४ व ५ नोव्हेंबर रोजी तसेच २५ व २६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

विशेष मतदार नोंदणी शिबिरांमध्ये मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडून नागरिकांचे मतदार नोंदणी, दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा निवडक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी काही विशेष शिबिरांना भेटी देऊन तेथील कामकाजाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करणार आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी कळविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR